How to Add Name in Ration Card: रेशन कार्ड मध्ये नाव कसे ऍड करावे

  • How to Add Name in Ration Card: रेशन कार्ड मध्ये नाव कसे ऍड करावे याची प्रोसेस आपण ऑनलाईन व ऑफलाईन बघणार आहोत.
  • आज आपण महाराष्ट्रात रेशनकार्ड मध्ये नवीन नाव ऑनलाइन व ऑफलाईन कसे ऍड करणार,अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती, प्रत्येक स्टेप तसेच नमुना अर्ज देणार आहोत.

Table of Contents

1. परिचय:

  • यापुढे जर कोणाला रेशन कार्ड काढायचे असेल किंवा त्यामध्ये काही दुरुस्ती करायचे असेल जसे कि नाव बदलणे, नवीन नाव ऍड करणे किंवा कमी करणे.
  • तर त्यांना ई रेशन कार्ड (E Ration Card) दिले जाणार आहे.
  • याचा अर्थ असा की यापुढे केशरी व पिवळ्या रंगातील असणारे पारंपारिक रेशन कार्ड हळूहळू बंद होत जातील.
  • या नवीन सुविधेवर कार्यप्रणाली सुरू झाली असून लवकरच वितरणही सुरू होणार आहे.
  • शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या लाभ घेण्यासाठी आपल्याला विविध कागदपत्रे जसे कि आधार कार्ड, मतदान कार्ड यासारखे महत्त्वाचे असणारे दस्तऐवज पाहिजे असतात त्यात अजून एक म्हणजे रेशन कार्ड.
  • रहिवासी पुरावा म्हणून देखील रेशन कार्डचा उपयोग होतो. स्वस्त धान्य दुकानांमध्ये पारंपारिक पिवळे केशरी पुस्तक स्वरुपातील रेशन कार्ड वापरले जाते, जे कि खूप योजना लाभासाठी आपण उपयोग करू शकतो.

2. ई रेशन कार्ड प्रणाली (E Ration Card):

  • ई रेशन कार्ड प्रणाली (E Ration Card) प्रणालीद्वारे महाराष्ट्र शासन खालील गोष्टी अगदी सोप्प्या आणि ऑनलाईन पद्धती मार्फत आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे.
  1. नवीन रेशन कार्ड काढणे (New Ration Card Online).
  2. रेशन कार्ड मध्ये नाव ऍड करणे (Add Name in Ration Card Online Maharashtra).
  3. रेशन कार्ड मधून नाव कमी करणे (Remove Name From Ration Card Online Maharashtra).
  4. रेशन कार्ड वरील पत्ता बदलणे (Change Address in Ration Card Online Maharashtra).
  5. रेशन कार्ड डाउनलोड करणे (Ration Card Download Online Maharashtra).
  • वरील सेवा ई रेशन कार्ड प्रणालीद्वारे (E Ration Card) महाराष्ट्र शासनाणे सुरु केलेल्या आहेत.

3. रेशन कार्ड मध्ये नाव ऍड करण्यासाठी लागणारी कागदपत्रे:

  • Documents required to add name in ration card.
  • खालील दिलेली कागदपत्रे रेशन कार्ड मध्ये नवीन नाव ऍड करण्यासाठी लागतात.
  1. पासपोर्ट आकाराचे फोटो
  2. आधार कार्ड
  3. पॅन कार्ड
  4. ड्रायविंग लायसन
  5. मतदान कार्ड
  6. अर्जदाराच्या नावावर चालू
  7. टेलिफोन बिल
  8. अर्जदाराच्या नावावर
  9. एलपीजी(LPG) कार्ड
  10. जॉब कार्ड
  11. लाईट बिल
  12. बँक पासबुक
  13. उत्पन्नाचे प्रमाणपत्र

4. How to Add Name in Ration Card Online:

  • रेशन कार्ड मध्ये नाव ऑनलाईन ऍड करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने करू शकता.
  • NFSE च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • जर तुम्ही प्रथमच वापरकर्ता असाल, तर तुम्हाला पोर्टलवर खाते तयार करावे लागेल.
  • महाराष्ट्रात नवीन रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

4.1. नोंदणी करा :

  • स्टेप १: NFSE च्या अधिकृत वेबसाईट वर जावे, उजव्या बाजूला sign in / register पर्याय दिसेल त्यावर जाऊन Public Login हा पर्याय निवडायचा आहे.
how to remove name from ration card online
how to remove name from ration card online
  • स्टेप २: “New user, sign up here” हा पर्याय निवडून त्यावर क्लिक करावे.
how to remove name from ration card online
  • स्टेप ३: नंतर “Register new ration car user” ची पॉपअप ओपन होईल त्यातील “I Want to Apply for New Ration Card” या पर्यायाची निवड करावी.
how to remove name from ration card online
how to remove name from ration card online
  • स्टेप ४: तुमच्यासमोर माहिती भरण्यासाठी फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुमची अचूक माहिती टाकून घ्यावी.जसे कि नाव मायबोली मध्ये व नाव इंग्रजी मध्ये, आधार क्रमांक, जेंडर, मोबाईल नंबर, ई-मेल ऍड्रेस टाकून घ्या.
  • स्टेप ५: एक लॉगिन आई-डी व पासवर्ड तयार करा.
  • स्टेप ६: नंतर Get OTP वर क्लिक करा.
  • स्टेप ७: तुमच्या मोबाइलला नंबर वरती एक OTP येईल तो प्रविष्ट करा, नंतर लॉगिन आई-डी व पासवर्ड च्या साहाय्याने लॉगिन व रेशन कार्ड मध्ये नाव ऍड करावे.

4.2. लॉगिन करा.

  • स्टेप १: तुम्ही नुकतीच तयार केलेली लॉगिन आई-डी व पासवर्ड च्या साहाय्याने पोर्टलवर लॉग इन करा.
  • स्टेप २: रेशन कार्ड सेवांमध्ये प्रवेश करा: एकदा लॉग इन केल्यानंतर, पोर्टलच्या मुख्यपृष्ठावर “रेशन कार्ड सेवा” किंवा तत्सम पर्याय शोधा.
  • स्टेप ३: “Add Member” अर्ज निवडा: तुम्हाला रेशन कार्ड मध्ये नाव कसे ऍड करण्याची अनुमती देणारा पर्याय निवडा.
  • स्टेप ४: अर्ज भरा: अचूक तपशीलांसह ऑनलाइन अर्ज भरा. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे, वय, लिंग आणि नातेसंबंध यासह कुटुंब प्रमुखांना माहिती द्यावी लागेल.
  • स्टेप ५: दस्तऐवज अपलोड करा: आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा, ज्यात ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा, कुटुंबातील सदस्यांची पासपोर्ट-आकाराची छायाचित्रे आणि आवश्यकतेनुसार इतर कागदपत्रे समाविष्ट आहेत.
  • स्टेप ६: अर्ज सबमिट करा: तुम्ही प्रविष्ट केलेल्या माहितीचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा, सर्व कागदपत्रे संलग्न असल्याची खात्री करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.
  • स्टेप ७: पोचपावती: यशस्वी सबमिशन केल्यावर तुम्हाला एक पोचपावती किंवा संदर्भ क्रमांक प्राप्त होईल. हा क्रमांक तुमच्या अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

5. How to Add Name in Ration Card Offline:

  • रेशन कार्ड मध्ये नाव ऑफलाईन ऍड करण्यासाठी अर्ज व वरील नमूद केलेली कागदपत्रे घेऊन तुम्हाला जवळील स्वस्त धान्य दुकान किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन ते कागदपत्रे जमा करावी लागतील.

6. निष्कर्ष:

  • महाराष्ट्रात रेशन कार्ड मध्ये नाव ऍड करण्यासाठी (How to Add Name in Ration Card maharashtra) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केल्याने महाराष्ट्रात नवीन शिधापत्रिका मिळवणे व इतर सेवांचा वापर अधिक सोयीचे झाले आहे.
  • सर्व पात्र कुटुंबातील सदस्यांचा शिधापत्रिकेत समावेश असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे, कारण ते केवळ अन्नसुरक्षेची हमी देत नाही तर विविध सरकारी लाभ आणि अनुदानांमध्ये प्रवेश देखील प्रदान करते.
  • लक्षात ठेवा की विशिष्ट आवश्यकता आणि कार्यपद्धती थोड्याशा बदलू शकतात, त्यामुळे नमहाराष्ट्रात रेशन कार्ड मध्ये नाव ऍड करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याबाबत अद्ययावत माहिती आणि मार्गदर्शनासाठी नेहमी अधिकृत महाराष्ट्र सरकारच्या पोर्टलचा संदर्भ घ्या. धन्यवाद.

Leave a comment