- आज आपण PMFBY: पिक विमा नुकसान भरपाई साठी अर्ज कसा करावा व पिकाची नुकसान झालेली आहे याची माहिती विमा कंपनीला कशी द्यावी हे बघणार आहोत.
Table of Contents
1. PMFBY पिकाची सद्यस्थिती:
- या वर्षी पावसाने जवळपास २५-३० दिवसांचा खंड दिलाय आणि त्यामुळेच पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २५ टक्के अग्रामी म्हणजेच २५ टक्के पीक विमा ऍडव्हान्स स्वरूपात शेतकऱ्यांना देण्यात यावा असे विमा कंपनीला आदेश दिले होते.
- परंतु काही करणे देत सध्या तरी कंपनीने २५ टक्के ऍडव्हान्स पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यास नकार दिला व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश Reject केलेले आहेत.
- अशातच आपल्या कडे पाऊस चांगला पडण्यास सुरु झालेला आहे व आता काही ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे.
- अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना महत्वाची सूचना म्हणजे आता आपण पीक विमा नुकसान झाल्याबाबत ची माहिती विमा कंपनीला कळविणे गरचेजे आहे जेणे करून विमा रक्कम आपल्याला मिळेल.
2. PMFBY पिक विमा नुकसान भरपाई दावा करण्याच्या पद्धती:
- पिकाची नुकसान झाल्याची माहिती तुम्ही तीन पद्धतीने करू शकता.
- crop loss intimation
१. कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावरती फोन करून, चोलामंडळ फायनान्स -18002089200
२. लेखी अर्ज, विमा पावती, बँक पासबुक व आधार कंपनीला पाठवून.
३. ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबईल चा वापर करून, थेट शेतीतूनच.
3. पिक विमा 2023 Claim प्रोसेस स्टेप बाय स्टेप:
मोबाईल द्वारे थेट शेतातून पीक विमा नुकसान भरपाई अर्ज कसा करायचा ते आपण स्टेप बाय स्टेप बघुयात.
Pik Vima Claim Process 2023
- स्टेप १- मोबाइल च्या प्ले स्टोअर मध्ये “Crop Insurance” Search करा किंवा “Crop Insurance येथे क्लिक करा” व अँप इन्स्टॉल करून घ्या.
स्टेप २- तुमच्या समोर ४ पर्याय दिसतील.
१- Register as Farmer
२- Login for Policies
३- Continue Without Login
४- Change Language“Continue Without Login” म्हणजेच ३ नंबरचा पर्याय निवडा.
स्टेप ३- तुमच्यासमोर पुन्हा ५ पर्याय दिसतील, त्यापैकी ३ नंबरचा पर्याय म्हणजेच “Crop Loss” या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप ४- तुमच्यासमोर “Crop Loss Intimation” व “Crop Loss Status” पर्याय दिसतील त्यापैकी “Crop Loss Intimation” वरती क्लिक करा.
- स्टेप ५- बॉक्स मध्ये तुमचा मोबाईल क्रमांक टाकून घ्या व “Send OTP” वरती क्लिक करा, तुमच्या आलेला OTP तिथे टाकून घ्या.
- स्टेप ६- आता खाली दिलेल्या पर्यायांची निवड करा.
- Season- Kharip
- Year- 2023
- Scheme- Pradhan Mantri Fasal Bima Yojana
- State- Maharashtra
- व नंतर “Select” या बटनावरती क्लिक करा.
- स्टेप ७- “From where did you enroll ?” मध्ये
“CSC” सेलेक्ट करा व त्यानंतर खाली बाजूला “Policy number” आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून तुमच्यासमोर “Policy number” टाकण्यासाठी बॉक्स ओपन होईल, त्यामध्ये तुमचा “Policy number” टाका व “Done” वर क्लिक करा.
- स्टेप ८- “Policy number” व डाव्या बाजूला एक चेकबॉक्स दिलेस त्यावर क्लिक करा तुमच्यासमोर पोलिसी चा सविस्तर तपशील दिसेल, खाली येऊन तुमचे पीक सिलेक्ट करून घ्या.
तुमच्या समोर एक पॉपअप ओपन होईल तिला “Allow” करा.
स्टेप ९- नंतर खाली दिल्याप्रमाणे पर्याय सिलेक्ट करा.
- Type of Incidence- Excess Rainfall(अतिवृष्टी) किंवा Inundation(पूर) कोणताही एक
- Date of Incidence- पाऊस झाल्याची तारीख (72 तासांपेक्षा कमी)
- Status of crop at the time of incidence- Standing crop
- Expected loss in percentage- 80 ते 100
- Remark- Excess Rainfall
- Upload Photo- पिकाचा फोटो अपलोड करा.
- Upload Video- पिकाचा व्हिडीओ अपलोड करा.
- शेवटी “Submit” या बटनावरती क्लिक करा.
स्टेप १०- “Submit” केल्यानंतर लगेचच “Docket ID” तयार होईल व तुमची पिक नुकसानीची तक्रार विमा कंपनीपर्यंत पोहोचेल.
या “Docket ID” चा उपयोग करून तुमचे स्टेटस तुम्ही कधीही तपासू शकता.
- अशा प्रकारे या सर्व स्टेप्स चा वापर करून तुम्ही तुमच्या पिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी दावा म्हणजेच अर्ज करू शकता.
- Crop Insurance Claims.
- माहिती आवडल्यास पुढे शेतकऱ्यांना नक्की पाठवा. धन्यवाद
अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.
- आदित्य L१ मिशन- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- आयुष्मान भारत योजना- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- लेक लाडकी योजना- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- ई पीक पाहणी- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- पीएम किसान अर्ज प्रक्रिया आणि अपडेट्स.
- पीएम किसान लाभार्थी स्टेटस असे चेक करा.
- पीएम किसान E-KYC कशी करावी- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या – www.mahitiwala.co.in