Covid Variant JN1 2023:कोरोना चा नवीन प्रकार जेएन १

आज आपण Covid Variant JN1 2023:कोरोना चा नवीन प्रकार जेएन १, कोविड 19 प्रकार जेएन १ या विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत.

Table of Contents

Covid Variant JN1(कोविड 19 प्रकार जेएन १):

  • डिसेंबर 2019 मध्ये भारतालाच नव्हे, तर जगाला कोरोना व्हायरसचे रूप दाखवणाऱ्या करोना व्हायरस चा (Covid19 ) नवीन उपप्रकार Covid Variant JN1 परत आलेला असून, आपले डोके डिसेंबर महिन्यातच वर काढून जगात परत मोठ्या प्रमाणात धोका पसरवत आहे.
  • आपल्या भारत देशाला, भारत देशालाच नव्हे तर जगाला डोकेदुखी ठरणाऱ्या अशा कोरोना व्हायरसने (Corona virus) परत एकदा आपले डोके वर काढले आहे.
  • याही वेळेस कोविड 19 जगाचा असा कोणताही कोपरा सापडणार नाही की त्या ठिकाणी कोरोनाव्हायरस जेएन1 पोहोचला नाही किंवा पोहोचणार नाही.
  • आपल्या उद्रेकामुळे प्रचंड नरसंहार करणारा कोरोना व्हायरस परत एकदा भारतात व राज्यत पसरू लागलेला आहे‌.
  • केंद्र सरकारच्या मिळालेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचा नवीन ओमाॅक्राॅनचा (Omacron ) उपप्रकार म्हणजेच जेएन1 ( JN1) या वायरचे रुग्ण भारतात सापडू लागले आहेत.
  • त्याचे प्रमाण केरळमध्ये 24 तासात 292 रूग्णांना यांचा संसर्ग झाला असून त्यात तिघांचा मृत्यू देखील झालेला आहे.
  • ८ डिसेंबर २०२३ रोजी जेएन1 चा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता, आता त्यात आणखीन भर ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व मुंबई मध्येही हा रुग्ण आढळून आला आहे.
  • (WHO)भारत, अमेरिका (America), चीन (Chaina) आणि सिंगापूर ( Shinganapur) या देशांमध्ये जेएन1 (JN 1)चे रुग्ण मोठ्या संख्येत सापडत आहे.
  • यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना व आरोग्य विभागांना सतर्कतेचा इशारा देऊन सावध राहण्याचे सांगितले आहे, व जनतेला आपली स्वतःची काळजी घेण्याचे सांगितले आहे.
  • गेल्या दोन आठवड्यात 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, यामुळे आपण आपल्या परिवाराची व परिवारातील सदस्याची काळजी घेऊन गर्दीच्याठिकाणी जाणे टाळून योग्य ती काळजी घ्यावी.
  • जागरूक होऊन इतरांनाही यासंदर्भात अधिक ती माहिती द्यावी व याविषयी कोणतेही अफवा व गैरसमज पसरून समाजाची दिशाभूल करू नये व डॉक्टरांची सल्लामसलत करून काळजी कशी घ्यावी हेही लोकांना व आपण समजून घ्यावे.
Covid Variant JN1 2023
Covid Variant JN1 2023

कोविड 19 प्रकार जेएन १ ची उत्पत्ती(Covid Variant JN1 Origin):

  • डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील (Chaina) मिहान ( Mihan ) शहरांमध्ये कोरोनाव्हायरस उत्पत्ती झाली संपूर्ण जगात हा वायरस पसरला.
  • वटवाघूळामुळे (bat) या वायरची निर्मिती झाली असून तो मानवामध्ये पसरत गेला व संक्रमित झाला.
  • कोरोना वायरस ला वैज्ञानिक दृष्ट्या SARS-CoV-2 असे नाव देण्यात आले आहे.

कोविड 19 प्रकार जेएन १ ची लक्षणे(Covid Variant JN1 Symptoms):

  • या आजारात रुग्णांमध्ये प्रथम दर्शनी ताप, खोकला, सर्दी व श्वासोच्छ्वास,श्वास घेण्यास त्रास होतो.
  • हा त्रास मध्यम व तीव्र स्वरूपाचा असतो.
  • काही व्यक्तींना या कोणत्याच त्रासाचा नसतो तरीदेखील अशी व्यक्ती या आजाराने बाधित असतात.
  • काहींना शासनाचा त्रास हा अति प्रमाणात असतो तर वृद्ध व्यक्तीमध्ये या आजाराची व आरोग्याची समस्या जास्त उद्भवते.
  • यामुळेच व्यक्तींचा यात मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असते.
  • लहान मुले व वृद्ध व्यक्ती या आजारात बाधीत होतात.
Covid Variant JN1 Symptoms
Covid Variant JN1 Symptoms

कोविड 19 प्रकार जेएन १ चा प्रसार (Spread of Covid 19 Variant JN1):

  • या आजाराने संक्रमित झालेला व्यक्ती जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा तो थेंबाद्वारे इतरत्र पसरतो.
  • संक्रमित झालेला व्यक्ती खोकताना किंवा शिंकताना आपला हात तोंडासमोर धरतो किंवा नाका समोर धरतो व तोच हात तो इतरत्र कोणत्याही ठिकाणी ठेवतो त्यावेळेस हे जंतू त्या ठिकाणी पसरतात व इतर व्यक्तींनी त्या ठिकाणी हात ठेवल्यामुळे होतो.
  • हा आपल्या तोंडाला किंवा नाकाला स्पर्श केल्यामुळे हे जंतू त्याच्याकडे संक्रमित होतो किंवा पसरतात.

कोविड 19 प्रकार जेएन १ वर उपाययोजना:

  • बाहेरून किंवा गर्दीच्या ठिकाणाहून आल्यावरती वारंवार हात धुणे कोणास हस्तांदोलन केल्यावर वारंवार हात धुणे.
  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे व सुरक्षित अंतर ठेवून बोलणे चालणे.
  • गरम किंवा कोमट पाणी पिणे व उकडलेले पदार्थ खाणे.
  • बाहेरून आणलेले सर्व पदार्थ किंवा सामान निर्जंतुकीकरण करूनच घरात घेणे व भाजीपाला दोन सुकवून त्यानंतरच खाणे.
  • चेहऱ्याला रुमालाने किंवा मास लावून बाहेर पडणे.
  • जंतू निर्जंतुकीकरण करणाऱ्या रसायनांचा वापर करणे.
  • रोगांची लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून यावरती उपाय योजना करणे.

जेएन १ सारांश:

  • कोरोनाव्हायरसने जगभरात कहर माजवला होता, मृत्यूचे ढिगारे पडत असताना, वैद्यकीय सुविधा त्यासाठी अपुऱ्या पडू लागल्या होत्या.
  • त्यावरती उपयुक्त असे औषधी त्याकाळी उपलब्ध नव्हती त्यासाठी त्यावरती परिणाम करणारे विविध असे औषधे देऊन रूग्णांवरती उपचार केले जात होते.
  • तरीही मृत्यूचा आकडा काही केल्या कमी होत नव्हता, रुग्णांची सेवा करण्यासाठी डॉक्टर रात्रंदिवस झटत होते, यासाठी सरकारने लॉकडाऊन ची भूमिका ही पत्करली होती
  • विविध देशात व भारतात ही लाॅकडॉन करण्यात आले होते, या लॉकडाऊनचा परिणाम जनसामान्यावरही झालाच लोकांचे रोजगार बुडाले, जेवणाचे हाल झाले व आर्थिक क्षेत्रालाही याचा बराच मोठा परिणाम बघावा लागला.
  • त्यामुळे आपली व आपल्या परिवाराची व समाजाची काळजी घेण्यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे असे काही रुग्ण आढळून आल्यास त्यांना त्वरित डॉक्टरांचे संपर्क साधाला लावून त्यावरती औषध उपचार करून घेण्यास सांगावे व आपण त्यांच्या संपर्कात न येता या आजाराचा प्रसारही होऊन न देण्यास मदत करावी.

Leave a comment