- आज आपण karj mafi yojana 2023: शेतकरी कर्जमाफी योजना महाराष्ट्र सत्यता याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत.
- नुकत्याच झालेल्या अधिवेशनापासून सर्व शेतकऱ्यांमध्ये शेतकरी कर्जमाफी विषयी संभ्रम निर्माण झालेले आहेत, कर्जमाफी झालीय का ?, झालीय तर कोण पात्र आहेत, माफीचे स्वरूप कशे आहे, जे रेगुलर शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काय आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आज बघुयात.
Table of Contents
कर्जमाफी झालीय का ?
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झालीय का ? (crop loan mafi) या बाबत सर्वच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे, तर शिंदे-फडणवीस सरकारने अगोदर झालेली कर्जमाफीच फायनल आहे व त्यापासून वंचित राहिलेले शेतकरी त्यांना तिचा फायदा घेता येईल परंतु नवीन कर्जमाफी संदर्भात अधिकृत माहिती सरकारने अद्याप जाहीर केलेले नाही.
खरीप 2023 च्या पीक कर्ज वसुलीस स्थगिती
- महाराष्ट्र सरकारने सद्यपरिस्थिती लक्षात घेता, महाराष्ट्र राज्यातील ४० तालुकया मध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे व त्यामुळे दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे.
- तसेच दिनांक 10 नोव्हेंबर, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील इतर तालुकयातील महसुली मंडळामध्ये जून २०२३ ते सप्टेंबर २०२३ या दरम्यान कमी पर्जगन्यमान झाल्याचे आढळून आले आहे.
- यादरम्यान झालेल्या मंत्री मंडळ बैठकीमध्ये निर्णय घेऊन ४० तालुके व अधिक १०२१ महसूल मंडळे त्यात समाविष्ट करण्यात आले.
- सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ/ दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्ये तसेच इतर तालुक्यामधील 1021 महसुली मंडळामध्ये पिक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत GR महाराष्ट्र सरकारने जारी केलेला आहे.
- दुष्काळ घोषित करण्यात आलेले ४० तालुके व १०२१ महसूल मंडळ – येथे क्लिक करा.
महात्मा फुले कर्ज माफी योजना
1. कर्जमाफी पात्र शेतकरी कोणते ?
- kisan karj mafi yojana 2023 maharashtra
- दि. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 यादरम्यान ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदतीचे पीक कर्ज आणि पुनर्रचित पीक कर्ज घेतले असेल ते माफ केले जाईल.
- शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज घेतलेले असेल ते शेतकरी.
- कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात महाराष्ट्र सरकार भरणार आहे.
- Karj Mafi website

2. कर्जमाफी अपात्र शेतकरी कोणते ?
- एप्रिल २०१९ नंतर पीक कर्ज घेतलेले शेतकरी. kisan karj mafi apatra shetkari
- आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार
- शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणारे शेतकरी
- सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी, शेतकरी
- २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेणारे शेतकरी
- महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून) असलेले शेतकरी
- केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून) असलेले शेतकरी.
- MJPSKY Portal
महात्मा फुले कर्ज प्रोत्साहन योजना
1. कर्ज प्रोत्साहन पात्र शेतकरी कोणते ?
- नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी ५०००० रुपये अनुदान.
- सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या कालावधीमध्ये तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेले शेतकरी.
- सदरील वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज त्याच वर्षी पूर्णतः परतफेड केलेले शेतकरी.
- प्रोत्साहनपर लाभ देतांना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक/ अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु. 50 हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल.
2. कर्ज प्रोत्साहन अपात्र शेतकरी कोणते ?
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.
- वरील प्रमाणे नियम लागू असतील , कर्जमाफी अपात्र शेतकरी कोणते ?
अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.
- आदित्य L१ मिशन- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- आयुष्मान भारत योजना- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- लेक लाडकी योजना- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- ई पीक पाहणी- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- पीएम किसान अर्ज प्रक्रिया आणि अपडेट्स.
- पीएम किसान लाभार्थी स्टेटस असे चेक करा.
- पीएम किसान E-KYC कशी करावी- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन रेशन कार्ड कसे काढावे- येथे क्लिक करा.
- रेशन कार्ड मध्ये नवीन कसे जोडावे- येथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या – www.mahitiwala.co.in