- Crop Insurance 2023: पिक विमा 2023 विषयी बोलायचे झाले तर प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत (pmfby) खरीप हंगाम 2023 मध्ये या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान याबाबतीत भरपाई निश्चित करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदेश देण्यात आलेले आहेत.
- 2023 या वर्षीचा जर आपण विचार केला तर सर्वदूर महाराष्ट्र मध्ये दुष्काळाचे सावट जाणवत आहे.
- जिल्हानिहाय परिस्थिती थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असू शकते, परंतु जास्तीत जास्त जिल्ह्यातील पिक हे खराब झालेले आहे.
- तसेच मोठ्या प्रमाणात पिकांच्या उत्पन्नात घाट झालेली दिसून येत आहे.
- आदेश बघण्यासाठी येथे क्लिक करा.
- जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)- आदेश

1. crop insurance 2023 rules (पिक विमा 2023) मंजुरी बाबतीत नियम:
- crop insurance 2023 rules (पिक विमा २०२३) बाबतीत काही नियम आहेत, आणि त्यानुसार जर हंगाम कालावधीत प्रतिकूल परिस्थिती उदा. पूर, पावसातील खंड, दुष्काळ, कीड व रोगांचा प्रादुर्भाव यांमुळे जर अधिसूचित महसूल मंडळ/ तालुका/जिल्हा यांमध्ये शेतकऱ्यांच्या चालू वर्षाच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये किती घट आहे ते बघितले जाते.
- आता उत्पन्नात घट आहे कि नाही हे कसे समजणार ?
- तर त्यासाठी मागील ७ वर्षांचे सरासरी उत्पन्न लक्षात घेतले जाते.
- जर या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत चालू वर्षीचे उत्पन्न ५० % पेक्षा जास्त कमी म्हणजेच घट जाणवत असेल तर परिच्छेद क्र. ११.१ होतो.
- परिच्छेद क्र. ११.१ नुसार जिल्हाधिकारी येणाऱ्या पिक विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्क्यांपर्यंत रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी असे निर्देश देऊ शकते.
- तसेच याच परिच्छेद क्र. ११.१ नुसार जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेली, जिल्हास्तरीय समिती यांच्यामार्फत अधिसूचना करण्यात येते.
- पिक विमा मंजूर यादी 2023

2. crop insurance 2023- पिक विमा 2023 क्षेत्र घटकातील अधिसूचित पिकांकरिता अधिसूचना निर्गमित करण्याबाबतच्या तरतुदी:
- तीव्र दुष्काळ स्थिती (दुष्काळ संहिता २०१६ नुसार).
- पावसातील तीन चार आठवड्यापेक्षा (२१ दिवसांपेक्षा) जास्त खंड आल्याने एकूण पावसात कमी झालेले प्रमाण.
- तापमानातील असाधारण घट/वाढ (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २० टक्के पेक्षा जास्त तफावत).
- पर्जन्यमानातील असाधारण कमी/जास्त प्रमाण (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २० टक्के पेक्षा जास्त तफावत).
- मोठ्या प्रमाणात किड, रोग यांचा पिकावरील प्रादुर्भाव (पीक पेरणी क्षेत्राच्या 25 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर तीव्र प्रादुर्भाव).
- इतर नैसर्गिक आपत्ती, पूरपरिस्थिती ज्यामुळे एकूण पिक पेरणी क्षेत्राच्या २५ टक्के पेक्षा जास्त क्षेत्र बाधित बाधित झाल्यास.
- वरील तरतुदींची शहानिशा हि उपग्रह छायाचित्र, वृत्तपत्र, बातम्या, नियमित अहवाल यांद्वारे होत असते.
3. जिल्हास्तरीय संयुक्त समिती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):
- पिक विमा मंजूर यादी 2023 औरंगाबाद
- परिच्छेद क्र. ११.१ च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय संयुक्त समिती, छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष श्री.आस्तिक कुमार पांडेय यांनी नमूद केलेल्या विमा क्षेत्र घटकातील अधिसूचित सोयाबीन, कापूस व मका यापिकांकरिता संदर्भ क्र. ३ च्या आदेशानुसार राज्यशासनाचे अधिकारी व विमाकंपनी चे प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार या पिकांचे मागील ७ वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्यामुळे नुकसान भरपाईस पात्र असल्याचे नमूद केले.
- प्राप्त सर्वेक्षण अहवालानुसार नमूद केलेल्या पिकांसाठी म्हणजेच सोयाबीन, कापूस व मका या साठी संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के रक्कम हि विमाधारक शेतकऱ्यांना चोलामंडल एम. एस. जनरल इन्शुरन्स लि., पुणे यांना आदेशित केले आहे.
4. पिक विमा 2023 (crop insurance 2023) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील नुकसान भरपाईस पात्र पिक, तालुका व महसूल मंडळे:
A. पिक- सोयाबीन:
- तालुका व महसूल मंडळ:
- छत्रपती संभाजीनगर – लाडसावंगी, चौका
- वैजापूर – शिवुर, गारज, नागमठाण, महालगाव, बाबतारा, वैजापूर, खंडाळा, जानेफळ, घायगाव, बोरसर
- गंगापूर – मांजरी, भेंडाळा, शेंदूरवादा, सिद्धनाथ वाडगाव, गाजगाव
B. पिक- कापूस:
- तालुका व महसूल मंडळ:
- छत्रपती संभाजीनगर – लाडसावंगी, चौका, पिसादेवी, शेकटा
- फुलंब्री – पिरबावडा
- वैजापूर – शिवुर, गारज, नागमठाण, महालगाव, बाबतारा, वैजापूर, खंडाळा, जानेफळ, घायगाव, बोरसर
- गंगापूर – मांजरी, भेंडाळा, शेंदूरवादा, सिद्धनाथ वाडगाव, गाजगाव
C. पिक- मका:
- तालुका व महसूल मंडळ:
- छत्रपती संभाजीनगर – लाडसावंगी, चौका, पिसादेवी, शेकटा
- फुलंब्री – पिरबावडा
- वैजापूर – शिवुर, गारज, नागमठाण, महालगाव, बाबतारा, वैजापूर, खंडाळा, जानेफळ, घायगाव, बोरसर
- गंगापूर – मांजरी, भेंडाळा, शेंदूरवादा, सिद्धनाथ वाडगाव, गाजगाव
- सदर आदेशानुसार चोलामंडल एम. एस. जनरल इन्शुरन्स लि., पुणे यांना १ महिन्याच्या आत पात्र ठरलेल्या सर्व शेतकरी विमाधारकांना संभाव्य विमा भरपाई रक्कमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.
- पिक हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे निश्चित होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी शेतकरी पात्र असतील त्यातून विमा भरपाईची आगाऊ रक्कम (२५ टक्के रक्कम) वजा करून नंतर राहिलेली नुकसान भरपाई रक्कम देण्यात येईल.
- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या – www.mahitiwala.co.in