Election Commission of India 2023: संपूर्ण माहिती

Election Commission of India 2023: आज आपण भारतीय निवडणूक आयोग 2023 या विषयी संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत.

Table of Contents

भारतीय निवडणूक आयोग स्वरूप:

  • भारतातील निवडणूक आयोग (Election Commission of India) हे भारतातील निवडणूक प्रक्रिया स्वतंत्रपणे व आनंदी वातावरणात निवडणूक प्रक्रिया घडवून आणत असते.
  • निवडणूक आयोगावरती कोणाचे हे निर्बंध नसतात तो स्वतंत्र असा आयोग आहे.
  • यावरती राष्ट्रपतींचेही किंवा लोकसभेतील सदस्यांचेही नियंत्रण नसते ते आपले कार्य करण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहे.
  • भारत हा लोकशाही असलेला देश आहे लोकशाहीमध्ये आपल्याला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे आपण कोणाला मतदान करावे किंवा करू नये हे ठरवण्याचा अधिकार आहे.
  • म्हणूनच आपण आपले निवडून दिलेले सदस्य हे लोकसभेत जाऊन आपले प्रतिनिधित्व करत असतात.
  • वयाची 18 वर्षाची पूर्ण झाली की आपणास मतदानाचा अधिकार आहे, आपल्याला मतदानाचा अधिकार असल्याने आपण कोणाच्याही दबावाखाली न येता आपल्या मर्जीने व इच्छेने आपण कोणास मतदान द्यावे हे आपण ठरू शकतो.
  • त्यासाठी घटनेतील कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे.
  • निवडणूक आयोग आपले कार्य हे कोणाचेही दबाव खाली न येता स्वयंपूर्ण पणे करत असते.

भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना:

  • केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना ही 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली आहे.
  • आपल्या संविधानातील कलम 324 नुसार भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
  • निवडणूक आयोग हा स्वतंत्र व कायमस्वरूपी असा आयोग आहे व 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन (National Voter’s Day) म्हणून साजरा करण्यात येतो.

भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India) रचना :

  • भारतीय निवडणूक आयोगात एक मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांच्यासाठी सहाय्यक आयुक्त असतात.
  • वेळोवेळी आयुक्त व सहाय्यक निवडणूक आयुक्त त्यांची राष्ट्रपती द्वारे नियुक्ती केली जाते.
  • 1953 पासून निवडणूक आयोगावर ती दोन सहाय्यक निवडणूक आयुक्त नेमण्यात येत आहे.
  • निवडणूक आयोगाच्या आयुक्ताची निवड ही भारताचे राष्ट्रपती करतात तसेच सहाय्यक निवडणूक आयुक्त त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.
  • निवडणूक आयुक्त तसेच सहाय्यक निवडणूक आयुक्त हे नियुक्त झाल्यापासून किमान सहा वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होऊन होईपर्यंत हे निवडणूक आयुक्त किंवा उपायुक्त म्हणून पदावरती राहू शकतात.
  • निवडणूक आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांना जर मुदतपूर्व राजीनामा द्यावयाचा असेल तर ते राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा देतात.
  • निवडणूक आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्याकडून यांच्या कर्तव्य पार पाडताना काही चूक झाल्यास किंवा अनुचित कार्य घडल्यास त्यांना आपल्या पदावरून दूर करण्यासाठी राष्ट्रपती महाभियोग या पद्धतीने त्यांना पदावर पदावरून हटवू शकतात.
भारतीय निवडणूक आयोग
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोगाचे कार्य:

  • भारतातील निवडणुका शांततापूर्ण आणि आनंदी वातावरणात निवडणुका पार करण्यासाठी कलम 324 नुसार निवडणूक आयोग आपले कार्य करत असते.
  • निवडणूक मतदार यादी तयार करण्याचे काम निवडणूक आयोग करतात.
  • घटक राज्याच्या विधिमंडळाच्या मतदार यादी निवडणूक आयोग तयार करतात.
  • संसदेच्या व घटक राज्याच्या निवडणुकांचे वेळापत्रक व त्यांचे संचालन ही निवडणूक आयोग करते.
  • राष्ट्रीय पक्षांना मान्यता देण्याचे काम निवडणूक आयोग करते.
  • मतदार संघ तयार करणे व मतदार संघामध्ये जागांचे योग्य नुसार वाटप करणे हे निवडणूक आयोग करते.
  • मतदार परिसंघात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांचे मतदारसंघ राखून ठेवण्याचे काम हे निवडणूक आयोग करते.
  • उमेदवारांचे निवडणूक चिन्ह निश्चित करण्याचे काम व अर्जाची छाननी करणे मतदारसंघ निश्चित करणे ठिकाण निवडणूक आयोग.
  • सार्वत्रिक निवडणुकांचे अधिक्षण, निर्देशक व नियंत्रण हे निवडणूक आयोग करते.
  • उमेदवारांच्या निवडणुकीत येणारा खर्च किती असावा याचेही नियोजन निवडणूक आयोग ठरवून देते.
  • निवडणुका चालू होण्या अगोदर आचारसंहिता लागू करण्याचे काम देखील निवडणूक आयोगाला करावे लागते.

निवडणूक आयोगाच्या आयुक्ताचा दर्जा:

  • Status of Commissioner of Election Commission
  • election commission of india upsc
  • भारतीय निवडणूक आयोगाच्या आयुक्ताचा दर्जा हा भारतातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या पदा एवढा असतो.
  • भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या परिसीमा मतदारसंघ यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही किंवा नियंत्रण ठेवू शकत नाही.
  • सर्वोच्च न्यायालय सुद्धा यात हस्तक्षेप करू शकत नाही.

नोटा NOTA (None of the Above):

  • नोटा स्वीकार भारतीय निवडणूक आयोगाच्या ४ ऑक्टोबर 2013 रोजी स्वीकारला.
  • वरीलपैकी कोणीही नाही म्हणजे नोटा नन ऑफ द ॲबॉव्ह या पर्यायचा स्वीकार केला.
  • निवडणूक प्रक्रियेत उभे असलेले उमेदवार हे उमेदवार मतदान करणाऱ्या आवडत नसतील किंवा ते त्या योग्यतेचे नसतील त्यासाठी मतदारास नोटा हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
  • त्यात मतदार हा वरीलपैकी कोणताही उमेदवार त्यास पसंत नाही किंवा त्या योग्यतेचा नाही हे ठरवू शकतो.

Leave a comment