- आज आपण Free Ration Scheme 2024: मोफत रेशन योजना (PMGKAY) सविस्तर माहिती बघणार आहोत, रेशन कार्ड धारकांसाठी ऐतिहासिक निर्णय म्हणजे पुढील पाच वर्ष आता मोफत धान्य मिळणार आहे, चला तर आपण याविषयी सविस्तर माहिती बघुयात.
Table of Contents
मोफत रेशन योजना भारत (Free Ration Scheme India)
- केंद्र शासनाने ८१ कोटींपेक्षा जास्त रेशन कार्ड धारकांसाठी पुढील पाच वर्ष मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (PMGKAY) गरीब कुटुंबांना दर महिन्याला ५ किलो धान्य हे रेशन स्वस्त धान्य दुकानावर मिळते.
- केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 नोव्हेंबर 2023 रोजी अंदाजे 81 कोटी + गरीब लोकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ला आणखी पाच वर्षे म्हणजेच डिसेंबर 2028 पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला ( फ्री रेशन योजना )मंजुरी दिली आहे.
- त्यानुसार आता पुढील पाच वर्ष गरीब कुटुंबांना दर महिन्याला ५ किलो धान्य हे रेशन, स्वस्त धान्य दुकानावर मोफत (फ्री रेशन) मिळेल.

मोफत रेशन योजना महाराष्ट्र (Free Ration Scheme Maharashtra)
योजना: | मोफत रेशन योजना |
प्रायोजक: | महाराष्ट्र्र सरकार |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी: | रेशन कार्ड धारक |
नोंदणी: | ऑटो लागू |
कालावधी: | २०२४-२०२८ (५ वर्ष ) |
- रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे १ जानेवारी २०२४ पासून पुढील पाच वर्षांसाठी २०२८ पर्यंत ८१ कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
- या निर्णयाद्वारे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (PMGKAY) गरीब कुटुंबांना दर महिन्याला ५ किलो धान्य हे रेशन स्वस्त धान्य दुकानावर मिळते.
- त्यानुसार पुढील पाच वर्षांसाठी सुमारे ११.८० लाख कोटी रुपये पेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे.

- free ration kab tak milega
- या योजनेअंतर्गत दि. १ जानेवारी २०१४ पासून ५ वर्षांसाठी तांदूळ, गहू आणि भरड धान्य हे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (PMGKAY) गरीब कुटुंबांना दर महिन्याला ५ किलो धान्य हे रेशन स्वस्त धान्य दुकानावर मोफत वितरित करण्यात येणार आहे.
PMGKAY म्हणजे काय?
- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजेच PMGKAY.
- 2020 मध्ये कोविड-19, कोरोना काळात या साथीच्या काळात हि योजना सुरू करण्यात आली, PMGKAY ची सुरुवात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना 5 किलो मोफत अन्नधान्य प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली होती.
PMGKAY अंतर्गत कोण कोण समाविष्ट आहेत?
- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत ( PMGKAY NFSA ) दोन प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना यामध्ये फायदा होतो.
- अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब (PHH) अंतर्गत येतात, जे दोन्ही या वर्षी जानेवारीमध्ये PMGKAY सोबत एकत्रित करण्यात आले होते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
मोफत रेशनची रक्कम किती आहे?
मोफत रेशन योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना दरमहा ५ किलो धान्य मिळते.
अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.
- आदित्य L१ मिशन- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- आयुष्मान भारत योजना- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- लेक लाडकी योजना- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- ई पीक पाहणी- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- पीएम किसान अर्ज प्रक्रिया आणि अपडेट्स.
- पीएम किसान लाभार्थी स्टेटस असे चेक करा.
- पीएम किसान E-KYC कशी करावी- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- नवीन रेशन कार्ड कसे काढावे- येथे क्लिक करा.
- रेशन कार्ड मध्ये नवीन कसे जोडावे- येथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या – www.mahitiwala.co.in