गोवारी प्रकरण (Gowari case) 1994: नेमकं सत्य काय ? संपूर्ण माहिती

  • गोवारी प्रकरण (Gowari case) आपण बोलायचे झाले तर, आपण लोकशाहीत जगतो लोकशाहीत वावरतो लोकशाहीत आपल्याला आंदोलन करण्याचा आपल्या मागण्या मांडण्याचा व सरकारकडून आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा अधिकार आपल्याला घटनेने दिलेला आलेला आहे.
  • आपल्यावरती होणारा अन्याय दाबून न ठेवता त्याला वाचा फोडून त्या विरोधात आंदोलन करणे ही लोकशाहीची भूमिका आहे.
  • पण अशाच भूमिका जर सरकार आपल्या अधिकाराने व हस्तक्षेपाने दाबून टाकत असेल व त्याकडे लक्षही देत नसेल तर ही घटना लोकशाही नसून यास हुकूमशाही असे म्हणावे काय ?

Table of Contents

1. गोवारी कोण (Gowari Who) ?

  • गोवारी प्रकरण (Gowari case) यासंदर्भात विचार करण्याअगोदर गोवारी कोण ? हे समजून घेऊ.
  • भारतात विविधता आहे आणि भारतात विविध समाजाचे जातीचे लोक भारतात राहतात त्याचप्रमाणे विदर्भात आणि मध्यम भारतात गोवारीनामक जमात ही अस्तित्वात आहे त्यांचा मुख्य व्यवसाय पशुपालन हा असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे.
  • गोवारी समाजाची १८६७ साली इंग्रजांनी यांची नोंद केली व या नोंदीत त्यांना राजगुंड समूहात गोवारी समाजाचा समावेश करण्यात आला.

2. गोवारी प्रकरण (Gowari case): गोवारी समाजाचा आरक्षणासाठी लढा

  • गोवारी प्रकरण (Gowari case): ज्याप्रमाणे आपण गोवारी समाज विषयी जाणून घेतो तर त्यांची समाजी परिस्थिती देखील तितकीच महत्वाची.
  • भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1951 साली अनुसूचित जाती जमाती मध्ये गोवारी समाज यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाच नाही तेव्हापासून गोवारी समाज हा आपले नाव अनुसूचित जातीमध्ये येण्यासाठी आंदोलने करत होता.
  • त्यासाठी भारत सरकारने 1951 / 1952 साली काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला.
  • या आयोगाने त्यांचा अहवाल सरकार समोर 1956 साली सादर केला याच अहवालात गोवारी समाजाचा उल्लेख गोंड गोवारी म्हणून करण्यात आला.
  • गोंड गोवारी समाजात उल्लेख झाल्यानंतर गोवारी समाजाला अनुसूचित जातीच्या सर्व सुविधा व सरकारचे आरक्षण मिळू लागले पण तदनंतर 24 ऑगस्ट 1985 साली महाराष्ट्र राज्य सरकारने असा GR काढला की गोंड गोवारी समाज अस्तित्वातच नाही असे सांगण्यात आले .
  • व असा GR त्यांनी काढला, असा GR काढल्यानंतर गोंड गोवारी समाज म्हणजेच गोवारी समाज यांना मिळणाऱ्या सर्व सवलती बंद करण्यात आल्या.
  • त्यामुळे गोवारी समाज दरवर्षी नागपूरला हिवाळी अधिवेशनात मोठा मोर्चा घेऊन जात व आमचा समावेश अनुसूचित जाती जमातीत करण्यात यावा यासाठी मोर्चा काढून मागणी करत.

3. गोवारी समाजाची चळवळ व मोर्चा (Movement and March of Gowari community)

  • यामध्ये असाच एक मोर्चा घेऊन गोवारी समाज 1994 ला हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाला होता.
  • त्या मोर्चा सुमारे पन्नास हजार गोवारी समाज जमा झाला होता यात लहान मुले बायका यांचा समावेश होता दोन दिवस पुरेल एवढ्या भाकरी बांधून गोवारी समाज हा नागपुरात दाखल झाला होता त्यावर्षी हिवाळी अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे होते.
  • गोवारी समाजाने सकाळपासूनच आपला मोर्चा बांधून अधिवेशनावरती धडकला होता पण त्यांचा मोर्चा चालू असूनही त्यांच्याकडे ना कोणी आमदार ना कोणी मंत्री ना कोणी सचिव या मोर्चाची दखल घेण्यासाठी आला होता ना कोणीही पाहिले नव्हते या गोष्टीचा गोवारी समाजाला राग तर होताच पण या मोर्चाकडे साधं कोणी लक्ष देऊ नये ही एक विचित्र परिस्थिती होती हे राज्य सरकारचे अपयशच होते.
  • सकाळपासून मोर्चात असलेला गोवारी समाज संध्याकाळचे साडेसहा वाजत आले होते तरी त्याच्याकडे कोणी आले नाही, थोड्याच वेळात मोर्चाच्या दिशेने एक लाल दिव्याची गाडी आली समाजातील लोकांना वाटले की कोणी मंत्री किंवा आमदार आपल्या शी बोलणी करण्यास आला आहे.
  • व आपल्या मागण्या ऐकून घेण्यासाठी आला आहे सर्वांनी त्या गाडीला वेडा दिला आणि सर्व एक वाटल्यामुळे पोलिसांनाही गर्दीचा आवाका आला नाही त्यामुळे पोलिसांनी त्या गर्दी वरती लाठी चार्ज केला या लाठीचार्ज इतका भीषण होती की याला लाठीचार्ज मध्ये चेंगराचेंगरी झाली.
  • व यात 114 जणांचा मृत्यू झाला त्यात 72 महिला 17 पुरुष व 23 अशी लहान मुले होती हा तर सरकारीच आकडा होता परिस्थिती त्यापेक्षाही बिकट होती .
  • तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे अधिवेशन संपल्यानंतर सरळ मुंबईला निघून गेले होते.
  • या चंद्राचींगरी एवढी भयानक होती यात रात्रभर मृतांची ओळख ही पटू शकली नाही.
  • मोर्चा लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले होते याही प्रश्न चे उत्तर आजपर्यंत मिळू शकले नाही सरकार आंदोलन तळपण्याच्या भूमिकेत होते हेही सिद्ध झाली नाही व सरकारने या आंदोलनाकडे लक्ष दिले नाही हेही यावरून सिद्ध झाले

4. गोवारी प्रकरणाचे पडसाद (Aftermath of Gowari case)

 

  • हि घटना नागपूरच्या मॉरिस कॉलेज टी पॉईंट या ठिकाणी झाली होती.
  • या घटनेची जबाबदारी सरकारने घेऊन तत्कालीन मंत्री मधुकरराव पिचड यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा दिला होता व नागपूरच्या मॉरिश कॉलेज टी पॉईंट ला गोवारी यांचे शहीद स्मारक स्थापन करण्यात आले.
  • या स्मारकाला रक्तशिल्प असेही म्हणतात तद नंतर सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय आयोगाची स्थापना करण्यात आली.
  • या घटनेमुळे महाराष्ट्रातही नाही तर संपूर्ण भारतात या घटनेचे पडसाद उमटले होते.
  • तर नंतर 1995 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या व याच निवडणुकीत गोवारी प्रकरणाचा काँग्रेसला मोठा पराभवाचा मोठा फटका बसला व पराभवाला सामोरे जावे लागले.
  • 1995 सालच्या निवडणुकीत कधीच सत्तेत न आलेल्या भाजप शिवसेना यांचे सरकार आले व काँग्रेसला विरोधी पक्षात बसावे लागले.
  • गोवारी प्रकरण (Gowari case)
gowar-smarka
गोवारी प्रकरण (Gowari case)

5. आरोप प्रत्यारोप (Accusation)

  • आयोगाचे काम चालू असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेले शरद पवार यांनी असे म्हटले की आयोगाच्या अहवालात फेरफार करून सरकार आपल्याला या प्रकरणात फसवण्याचा प्रयत्न करत आहे असे आरोपही त्यांनी त्यावेळी केले.

6. आयोगाची स्थापना व अहवाल

  • 1998 साली दाणी आयोगाच्या अहवाल आला व या आयोगात त्या आयोगाने असे सांगितले की या मोर्चात झालेल्या लाठीचार्ज साठी सरकार जबाबदार नाही.
  • लाठीचार्ज चे दाणी आयोगाने समर्थनच केले होते या चेंगराचेंगरी मृत्यू झालेल्या लोकांचे अहवालानुसार सांगण्यात आले की यांचा मृत्यू त्यांना श्वास न घेता आल्यामुळे व लाठीचार्ज केल्यामुळे त्या दुखापतीमुळे यांचा मृत्यूही झाला.
  • या संपूर्ण घटनेस दाणी आयोगाने सरकारला जबाबदार ही धरले नव्हते यामुळेच तत्कालीन सरकार शरद पवार यांचा या अहवालात पूर्ण मुक्तता करण्यात आली व यांना निर्दोष ठरवण्यात आले

7. सारांश (Summary)

  • समाज आपल्या मागण्यांसाठी व अधिकारासाठी सतत झगडत असतो, तो विविध मार्गांनी प्रयत्न करत असतो.
  • सरकारला या सर्व गोष्टींची माहिती असते पण सरकार असे दर्शविते की आपल्यलाला काही माहिती नाही, कधी सरकार अशी आंदोलने दडपण्याचा प्रयत्न देखील करते.
  • यात काही हानी झाल्यास सरकार नामानिराळे राहते व यात तोटा होतो तो आंदोलन करण्याचा.

Leave a comment