Maratha Protest: मराठा आरक्षणासाठी लढणारे “मनोज जरांगे पाटील” कोण आहेत ?

  • Maratha Protest: मराठा आरक्षण (Maratha Reservation) हे शब्द कानावर पडले कि खूप साऱ्या आंदोलकांची नवे समोर येऊन उभी राहतात, त्यातीलच यावर्षी चर्चेत असलेलं एक नाव म्हणजेच “मनोज जरांगे पाटील” ज्याने पूर्ण महाराष्ट्र एकत्र केला आणि सर्व मंत्री मंडळ हलऊन टाकले.
  • आणि मग प्रश्न उपस्तिथ होतो असा कि “मनोज जरांगे पाटील कोण आहेत ?” “Who is Manoj Jarange Patil ?”

Table of Contents

1. मनोज जरांगे पाटलांची पार्श्वभूमी (Background):

  • प्रयत्न असे करा की प्रशासनच काय सरकारलाही तुमच्या प्रयत्नाची दखल घ्यावीच लागेल, मग ते तुमचे प्रयत्न स्वच्छ व समाजासाठी असेल पहीजे समाज तुमच्या पाठीमागे उभा राहण्यास घाबरत नाही कारण त्यांनाही विश्वास असतो की आपल्या हक्कासाठी लढणारा लढव्वया आहे.
  • यासाठी ना तुम्हाला धष्टपुष्ट शरीर पाहिजे ना तुमच्या मागे कोण या मोठ्या नेत्यांचा हात पाहिजे तुम्ही एका सामान्य माणसातून सुद्धा आपले म्हणणे सरकारपर्यंत आपल्या पद्धतीने पोहोचू शकतात.
  • याचे उत्तम उदाहरण म्हणजे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आंतरवली सराटी या गावात सुरू असलेले “मनोज जरांगे पाटील” यांचे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण.
  • 2022 साली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकल मराठा समाजाची एक बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये आमदारमंत्री व मराठा समाज समन्वय उपस्थित होते या बैठकीला मनोज जरांगे पाटील देखील उपस्थित होते पण त्यांचा आवाज काही मुख्यमंत्री पर्यंत पोहोचला नाही.
  • त्यांनी ठरवलं की मुख्यमंत्र्याला आपल्या कार्याची दखल घ्यायला लावायची यासाठी त्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आणि त्याची दखल आज खुद्द मुख्यमंत्री घेत आहेत.
  • चाळीस वर्षापासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या चेहरा म्हणून “मनोज जरांगे पाटील” बनले आहे.
  • सडपातळ बांधा गळ्यात भगवे उपरने कपाळावर टिळा अशी शरीर यष्टी असलेले व समाजाविषयी निष्ठा समाजासाठी कार्य करण्याची इच्छा व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न यामुळेच सकल मराठा समाज आज त्यांच्या मागे नेटाने उभा आहे.
  • आज मराठा समाजाचे नाही तर संपूर्ण आमदार खासदार मंत्री सर्वांना त्यांच्या कार्याची दखल घेत आहे काही वर्षापासून थंडावलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांनी आपल्या कार्यातून परत गरम केला व याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

2. मनोज जरांगे पाटील कोण आहेत ?

  • Who is Manoj Jarange Patil
  • Maratha Protest (मराठा प्रोटेस्ट)
  • बीड जिल्ह्यातील मातोरे गावात राहणाऱ्या “मनोज जरांगे पाटील” यांचं जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण झालं घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी शिक्षणानंतर नोकरीच्या शोधा गाव सोडले व ते अंबड शहरात आले.
  • अंबड शहरात त्यांनी हॉटेलमध्ये नोकरी सुरू केली व नोकरी सुरू असताना त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचे कार्य व त्यांचे प्रश्न मांडण्याची शैली व समाज कार्य बघून त्यांना जालना जिल्ह्याचे युवक काँग्रेस अध्यक्षपद देण्यात आले.
  • काही वर्ष काम केल्यानंतर काँग्रेसने जेम्स लेन प्रकरणात जी भूमिका घेतली होती ती त्यांना मान्य नव्हती व याच कारणावरून मनोज जरांगे पाटील यांनी 2003 साली युवक काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

3. मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आंदोलने :

  • Movements by Manoj Jarange Patil
  • मराठा प्रोटेस्ट (Maratha Protest)
  • त्यानंतर त्यांनी त्यानंतर 2011 साली त्यांनी शिवबा संघटनेचे स्थापना केली मराठा आरक्षणासाठी त्यांनी ठीक ठिकाणी आंदोलने केली.
  • 2014 साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी काढलेला भव्य मोर्चा त्यांच्या चर्चेचा विषय ठरला होता.
  • 2012 व 13 मध्ये त्यांनी पैठण तालुक्यातील नाथ सागर जलाशयाच्या डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात यावे यासाठी आंदोलने ही केले.
  • 2016 साली कोपर्डी येथील प्रकरणानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनही केले.
  • व या प्रकरणातील दोषी असलेले गुन्हेगार यांना न्यायालयात नेत असताना त्यांच्यावर हल्लाही झाला असे म्हटले जाते हे हल्ले करणारे चौघेजण हे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थकच होते असे म्हटले जाते.
  • मुंबई येथे काढलेला मराठा क्रांती मोर्चा साठी मनोज जरंगे पाटील यांनी गावागावात मराठा समाजातील लोकांना जमा करून ते मुंबईत घेऊन आले व मुंबईचा मोर्चा यशस्वी करून दाखवला.
  • तद नंतर मराठा आरक्षणाविषयी कोर्टात याचिका दाखल झाल्या व समितीही नेमण्यात आली. समित्यांचे अहवाल यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा थोडासा विसर पडल्यासारखा झाला पण मनोज जरांगे पाटील यांनी त्याचा विसर न पडू देता लोकांमध्ये याची भावना सतत आपल्या आंदोलनातून धगधगती ठेवली.
  • 2001साली मनोज जरांगे पाटील यांनी साष्ट पिंपळगाव या ठिकाणी सलग 90 दिवसाचे ठिय्या आंदोलन केले व वेगवेगळ्या मागण्या त्यांनी केल्या व त्या मागण्या पूर्ण करून घेतल्या.
  • त्याच वर्षी त्यांनी आणखी एक आंदोलन गोरीगंधारी येथे केले, आंदोलनाचे कारण होते की मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुंटूबियांना शासकीय मदत मिळावी व हे आंदोलन त्यांनी यशस्वी करून दाखवले.
  • मराठवाड्यापासून ते मुंबई पर्यंत आंदोलन त्यांनी यशस्वी करून दाखवले मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी ते राजकीय नेत्यांनाही व सताधारी यांना प्रश्न विचारू लागले व मराठा समाजाचा एक चेहरा म्हणून समोर आले.
  • आंदोलन मराठा समाजासाठी असो या शेतकऱ्यांसाठी ते कधी मागे हटले नाही व त्यांच्या मागे उभे राहिले ते समाजाचे बळ यामुळे ते काही मागे हटले नाही.

4. मनोज जरांगे पाटील यांचे आताचे आंदोलन:

  • जानेवारी महिन्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलन उभे केले व याच आंदोलनाची दखल खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन त्यांच्याशी बोलणे करून त्यांना शब्द दिला की तुमच्या विविध मागण्या मान्य होतील पण त्यावर काही कार्यवाहीत झाली नाही.
  • यानंतर ऑगस्ट महिन्यात मनोज जरांगे पाटील यांनी शहागड येथे आंदोलन केले व या आंदोलनाचे कोणत्याही राजकीय नेत्यांनी याची दखल घेतली नाही.
  • त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ठरवले जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवायचे आणि या आंदोलनाला सुरुवात झाली ती 29 ऑगस्ट रोजी.
  • मनोज जरांगे पाटील व त्यांचे समर्थक यांनी आंदोलन सुरू ठेवले.
  • १ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांचे तब्येत बिघडली व त्यांना शासकीय दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी पोलिस आले होते.
  • परंतु मनोज जरांगे पाटील यांची तपासणी खाजगी डॉक्टर कडूनच केली जाईल असे त्यांचे समर्थक म्हणत होते.
  • अशाच वेळी आंदोलक व पोलीस यांच्यात झटापट झाली व पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.
  • अशी माहिती वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून मिळाली त्यानंतर माहिती एवढी वेगाने आंतरवली सराटी गावातच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात व संपूर्ण महाराष्ट्रात पसरली या घटनेचे पडसाद ठिकठिकाणी उमटू लागले.
  • मराठा समाजाने विविध ठिकाणी जाळपोळ करून या घटनेचा निषेध नोंदवला या ठिकाणी रात्री काही राजकीय नेत्यांनी भेटी देण्याचा सपाटा चालू ठेवला व सकाळीही राज्यातले बडे नेते या ठिकाणी येऊन गेले.
  • राज्य सरकारकडून नितेश राणे व गिरीश महाजन यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली पण पण मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागणी वरती ते ठाम राहिले व या ठिकाणी बसूनच आरक्षण घेऊन असे त्यांनी सांगितले.
  • मराठा प्रोटेस्ट (Maratha Protest)

5. सारांश (Summary):

  • मराठा समाजाचा आरक्षणाचा थंडावलेला प्रश्न मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी वरती आणून तो धगधगत ठेवला आहे.
  • मराठा समाजासाठी आंदोलने करून मराठा आरक्षणाचा चेहरा बनलेलेआहे मनोज जरांगे पाटील आता आरक्षण याच ठिकाणी घेऊ या निर्णयावरती ठाम आहे.
  • यासाठी सरकारी पातळीवरती जोरांच्या हालचाली सुरू झाले आहेत व सरकार या घटनेकडे विशेष लक्ष देऊन आहे.
  • त्यांचे म्हणणे आहे की मराठा समाजाला OBC मध्ये सामावून घ्यावे पण यासाठी OBC संघटनेने विरोध केला आहे.
  • आता पुढे काय घडणार ते बघुयात.

अधिक माहितीसाठी हे देखील वाचा.

  • अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या – www.mahitiwala.co.in

Leave a comment