new parliament building: नवीन संसद भवन याविषयी संपूर्ण माहिती

  • new parliament building: नवीन संसद भवन याविषयी संपूर्ण माहिती, या वर्षी भारताचे प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले त्याविषयी सविस्तर माहिती आज आपण बघुयात.

Table of Contents

1. New Parliament Building: परिचय

  • The New Parliament Building: नवीन संसद भवन, ज्याला नवीन संसद भवन असेही म्हणतात, हा भारतातील सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
  • वास्तुविशारद बिमल पटेल (Bimal Patel) यांनी डिझाईन केलेली ही इमारत देशाच्या समृद्ध स्थापत्य परंपरा आणि जुन्या संसद भवनातील घटकांचा समावेश करताना “रायझिंग इंडिया” चे खरे प्रतिनिधित्व करण्याचे उद्दिष्ट ठेवते.
  • सध्याच्या संकुलाला लागूनच नवीन संसद भवनाचे बांधकाम होत आहे, संसद भवन इस्टेटच्या प्लॉट क्रमांक 118 मध्ये आहे.
New Parliament Building by Tata Projects Ltd
New Parliament Building by Tata Projects Ltd

2. New Parliament Building: रचना

  • Design of New Parliament Building: नवीन संसद भवनाचे इमारत ही टाटा समूहाच्या टाटा प्रोजेक्ट लिमिटेड या भारतीय कंपनीने बांधली आहे.
  • टाटा प्रोजेक्टचे सदस्य सध्याचे अध्यक्ष हे डॉक्टर प्रवीण सिन्हा हे आहे.
  • तसेच नवीन संसद भावनाची डिझाईन व आर्किटेक्चर हे गुजरात मधील एचसीपी डिझाइन्स अँड आर्किटेक्चर या कंपनीने केली आहे.
  • विमल पटेल हे वास्तुविशारद व स्थापत्य क्षेत्रातील असामान्य कार्य केल्याबद्दल यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.
  • हे या नवीन संसद भवनाचे मुख्य वास्तु विशारद आहे.

3.New Parliament Building: वैशिष्ट्ये

  • Features of New Parliament Building: नवीन संसद भवनाची वैशिष्ट्ये जर बघायची म्हटलं तर सर्वात अगोदर लक्ष्य जाते ते प्रवेशद्वार. 
  • नवीन संसद भवनाला तीन मुख्य प्रवेशद्वार बनवण्यात आले आहे.

१) ज्ञानद्वार (knowledge Dwara)

२) शक्ती द्वार (Shakti Dwara) आणि

३) कर्म द्वार (Karma Dwara) बनवण्यात आले आहे.

  • तसेच यात उपसहाद्वारे हंसव्दार, शार्दुल द्वार, मकर द्वार, गरुड द्वार, व अश्वव्दार बनवण्यात आले आहेत.
  • नवीन संतोष संसद भवनाची रचना ही मध्य प्रदेशातील विधीशातील त्रिभुज आकार विजय मंदिराप्रमाणे करण्यात आलेले आहे व मध्यवर्ती प्रेक्षक राजा खुल्या भागात भारताचा राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष हा लावला गेला आहे.
  • नवीन संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच मध्यवर्ती प्रेक्षक गृह आहे या ग्रहास भेट द्यायची असेल तर खासदार किंवा विशेष परवानगी घेऊनच या प्रेक्षक ग्रहाला भेट देण्यासाठी परवानगी मिळू शकते ही इमारत भूकंप रोधक बनवण्यात आली आहे.
  • नवीन संसद भवनात संसदेच्या सर्व सदस्यांसाठी स्वतंत्र कार्यालय व त्यात अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध आहे.
  • नवीन संसद भवनातील लोकसभा सदस्यांसाठी 888 आसनक्षमता बनवण्यात आली आहे याआधी आसन क्षमता हि 545 एवढी. होती भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर याच्या मध्यवर्ती कल्पनेवरती आधारित लोकसभेची रचना व सजावट केली आहे.
  • नवीन संसद भवनाच्या राज्यसभेच्या आसनाची क्षमता ही 384 करण्यात आली आहे याआधी आसनक्षमता हि 245 एवढी होती भारताचे राष्ट्रीय फूल कमळ हे या मध्यवर्ती असलेल्या आसनक्षमतेची रचना करण्यात आली आहे.
  • नवीन संसद भवनातील मध्यवर्ती भागात संविधान सभागृह बनवण्यात आले आहे यात भारताच्या लोकशाहीचा वारसा व भारतीय राज्यघटनेची मूळ प्रतही तेथे ठेवण्यात येणार आहे.
  • नवीन संसद भवनाच्या इमारतीवर मध्यस्थानी 6.5 मीटरचा उंचीचा भव्य असा अशोक स्तंभ बनवण्यात आला आहे हा अशोक स्तंभ 950 किलो वजनाचा आहे व त्याची रुंदी 4.4 मीटर इतकी आहे देशातील सर्वोच्च असा स्तंभ हास असेल हा बनवण्यासाठी सुमारे नऊ महिन्याचा कालावधी लागला आहे.
  • नवीन संसद भवनाची इमारत ही चार मजली असून तिची उंची साधारणतः 39.6 मीटर एवढी असून तिचे आकारमान 64 हजार 500 चौरस मीटर आहे.
  • new parliament building inauguration date
  • New Parliament Building Cost: नवीन संसद भवनाची इमारत बांधण्यासाठी सुमारे 971 कोटी रुपये एवढा खर्च आला आहे हे इमारत बांधण्यासाठी 29 महिन्याचा कालावधी ही लागला आहे.
New Parliament Building
New Parliament Building

4. नवीन संसद भवनातील सुरक्षा व्यवस्था:

  • Security Arrangements at New Parliament Building: नवीन संसद भवनाची सुरक्षेची अचूक व्यवस्था करण्यात आली आहे.
  • अत्याधुनिक शस्त्र आणि सज्ज सुरक्षा दल अग्निशामक यंत्रणा असे अनेक व्यवस्था करण्यात आली आहे.
  • नवीन संसद भावनात अत्याधुनिक सायबर प्रणालीने सज्ज अशी प्रोऍक्टिव्ह सायबर सिक्युरिटी ही बसवण्यात आली आहे.
  • नवीन संसद भवनात 360 अंशाने फिरतील असे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत या कॅमेरेतून चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आहे.
  • नवीन संसद भावना सर्व कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश देण्यात आले आहे मार्शल सुरक्षा कर्मचारी व अधिकारी चेंबर अटेन्डंट वाहनचालक यांचा नवा गणवेश आहे.
  • नोकरशहाचा बंद गळा कोट जाऊन आता त्यात गुलाबी गर्द रंगाचे जॅकेट घालावी लागणार आहे.
  • त्यावर कमळ फुलाचे नक्षीकाम केलेले असेल व मार्शलना यांना सफारी सूट ऐवजी क्रीम रंगाचा कुर्ता पायजमा देण्यात आला आहे.

5. नवीन संसद भवनासाठी देशाचे योगदान:

  • Country Contribution for New Parliament Building: नवीन संसद भवनातील इमारतीमध्ये विविध राज्यातील विविध गोष्टी आणण्यात आलेले आहे.
  • म्हणजे विविध राज्यातून संसद बनवण्यासाठी विशेष सहकार्य लाभलेले आहे.
  • यामध्ये सभागृहातील जमिनीवर बांबूचे आच्छादन टाकण्यात आले असून त्यावरील प्रावरण हे मिर्जापुर मध्ये तयार करण्यात आलेले आहे.
  • रंगरंगोटी साठी वापरण्यात आलेला लाल व पांढऱ्या रंगाचे दगड हे राजस्थानतील ढोलपूर जिल्ह्यामधील सरमथुरा येथून आणण्यात आले आहे.
  • त्रिपुरा येथील बोधजंगनगर येथील मुथा इंडस्ट्रीज मधून कंपनीने छतावरील बांबूची सजावट केली आहे.
  • बांधकामाची वाळूही हरियाणातील चरखी दादरी येथून आणण्यात आली असून छतासाठी वापरण्यात गेलेले पोलाद हे दिव दमन येथून आणण्यात आले आहे.
  • दगडांच्या जाळ्याचे काम हे राजस्थान चे राजानगर व नोएडा येथील करण्यात आलेले आहे.
  • संसद भवनातील अंतर्गत सजावटीसाठी सागवानी लाकूड हे नागपूर येथून मागवण्यात आले आहे व इतर फर्निचर हे मुंबईत तयार करण्यात आलेले आहे.
  • लोकसभेत लावण्यात आलेले हिरव्या रंगाचे मार्बल हे उदयपूर व राज्यसभेसाठी लावण्यात आलेले लाल ग्रॅनाईट हे अजमेर मधून तर पांढऱ्या रंगाची संगमरवर हे राजस्थानमधील अंबाजी येथून आणण्यात आले आहे.

6. सारांश:

  • भारत विश्व ग्रुप बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
  • जुन्या गोष्टी सोडून नव्या गोष्टीचा स्वीकार करून व त्या अमलात आणून जनतेच्या हितासाठी व जनतेच्या कल्याणासाठी त्यांचा वापर करत आहे.
  • देश आधुनिक तिकडे वाटचाल करत असताना जुन्या गोष्टी सोडून आधुनिक गोष्टींना कल देऊन नाव निर्माण करण्यासाठी व नवीन गोष्टी घडवण्यासाठी जुन्या गोष्टी सोडणे कधीही चांगले.
  • असे नाही की जुन्या गोष्टींनी आपल्याला काहीच दिले नाही, जुन्या गोष्टीच्या पायावरतीच आपण या ठिकाणी पोचलो आहोत.
  • पण त्याच गोष्टी धरून नवीन आधुनिक जगाकडे जाताना भरपूर अशा अडचणी येतील त्यामुळे जुन्या गोष्टी सोडून नवीन देशाचे नवीन गोष्टीची सारखा संकल्पना करणे कधीही योग्य असणार आहे व ते बघायला देखील मिळत आहे. धन्यवाद.

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या – https://mahitiwala.co.in/

1 thought on “new parliament building: नवीन संसद भवन याविषयी संपूर्ण माहिती”

  1. संसद भवनात लावण्यात आलेले लाकूड हे आलापल्ली वन विभागातून प्राप्त केलेले आहे, व ते महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात आहे

    Reply

Leave a comment