Samudrayaan Mission: समुद्रयान मोहीम काय आहे, उद्देश काय ?

  • Samudrayaan Mission: लवकरच भारत मत्स्य 6000 (Matsya 6000) नावाच्या पाणबुडीला घेऊन महासागराच्या पोटातली रहस्य शोधण्यासाठी जाणार आहे.
  • “समुद्रयान मोहीम” आखून भारत समुद्रातील खोलवर चे रहस्य यातून उलगडणार आहे, याच विषयीची माहिती आज आपण बघुयात.

Table of Contents

1. परिचय:

  • भारताच्या महत्त्वाकांक्षी समुद्रयान मोहिमेचे उद्दिष्ट पहिल्या-वहिल्या पाण्याखालील सबमर्सिबलद्वारे समुद्राच्या खोलीचा शोध घेण्याचे आहे.
  • “टायटन सारखी सबमर्सिबल” म्हणून ओळखला जाणारा हा प्रकल्प तीन लोकांना पाण्याखालील प्रवासात 6,000 मीटर खोलीपर्यंत नेईल.
  • MATSYA 6000 नावाचे पाणबुडी खोल समुद्रातील संसाधनांचा अभ्यास करण्यासाठी, जैवविविधतेचे मूल्यांकन करण्यासाठी आणि महासागराच्या शोधात भविष्यातील प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
Samudrayaan Matsya 6000
Samudrayaan Matsya 6000
  • या मोहिमेनंतर भारत अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान आणि चीन या देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल.आजवर फारच थोड्या देशांनी समुद्रात एवढ्य खोलवर माणसांना पाठवण्यात आलं आहे.
  • गगनयान, आदित्य L1व चंद्रयान यासारख्या मोहिमानंतर हा भारताच्या या मोहिमांसारखाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
  • समुद्रात सहा किलोमीटर खोलात जाऊन अभ्यास करणे, तिथल्या जैवविवधेतची पाहणी करणं आणि तिथे असलेल्या साधनसंपत्तीचा भारताच्या विकासासाठी उपयोग करणे, असा या साधारण मोहिमेचा उद्देश आहे.
  • चेन्नईतल्या नॅशनल इन्स्टट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी ( National Institute of Ocean Technology, Chennai) अर्थात NIOT ने या प्रकल्पाची आखणी केली असून या मोहिमेला इस्रोचाही हातभार लागला आहे.
  • भारताचे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी 11 सप्टेंबर 2023 रोजी NIOT( National Institute of Ocean Technology ) चेन्नईतील मुख्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी या मोहिमेसाठी भारत सज्ज असल्याचं प्रसार माध्यमांना सांगितले.
  • “समुद्रयान सागरी परिसंस्थेत व्यत्यय आणणार नाही. पण पंतप्रधान मोदींच्या ब्लू इकॉनॉमी (Blue Economy) च्या उद्दिष्टांना ही मोहिम बळ देईल.”
  • भारतने एकाच वेळी ‘गगनयान’द्वारे  अंतराळात आणि ‘समुद्रयान’द्वारे महासागरात मानवी मोहिमा पाठवण्यासाठी तयारी करत आहे.

2. Samudrayaan Mission : उद्दिष्टे आणि महत्त्व (Objectives and Significance):

  • समुद्रयान मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट एक पाणबुडी विकसित करणे हे आहे जे खूप खोलवर जाऊ शकते आणि समुद्राच्या तळाचा शोध घेऊ शकते. हा प्रकल्प भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण तो देशाला सक्षम करेल:
  • खोल-समुद्री संसाधनांचा अभ्यास (Study deep-sea resources)
  • जैवविविधतेचे मूल्यमापन (Assess Biodiversity)
  • तांत्रिक क्षमता (Enhance technical capabilities)

3. Samudrayaan Mission: समुद्रयान काय आहे ?

  • समुद्रयान मोहिमेची माहिती घेत असताना, समुद्रयान काय आहे ? (What is Samudrayaan Mission ?) हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल.
  • समुद्रयान प्रकल्प हा भारत सरकारच्या डीप ओशन मिशन(Deep Ocean Mission of Government of India) या खोल महासागराच्या अभ्यासासाठीच्या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे.
  • NIOT( National Institute of Ocean Technology ) हे डीप ओशन मोहीम राबवत आहे अंदाजे त्यावर एकूण 4,077 कोटी रुपयांचा खर्च होईल.
  • या मोहिमेअंतर्गत NIOT( National Institute of Ocean Technology ) ने या अगोदर डिसेंबर 2022 मध्ये मध्य हिंदी महासागरात सागर निधी नावाचे जहाज पाठवलं होतं.
  • या जहाजावर असलेल्या OME 6000 AUV (Ocean Mineral Explorer) ) या रोबॉटिक पाणबुडीनं 5,271 मीटर खोलावर जाऊन तिथे मँगनीज खनिजाचा शोध घेतला होता.
  • या मोहिमेच्या पुढील टप्प्यात ३ भारतीयांना घेऊन एक छोटी स्वयंचलित पाणबुडी महासागरात खोलवर जाईल.
  • म्हणून या प्रकल्पाला समुद्रयान म्हणूनही ओळखलं जाईल.
  • समुद्रयान मोहिमेचा विचार 2019 पासूनच सुरू झाला होता. 2020 मध्ये त्यावर काम सुरू झालं आणि 2025-26 पर्यंत पाणबुडी प्रत्यक्षात खोलवर समुद्रात पाठवली जाणार आहे.
समुद्रयान मोहीम
समुद्रयान मोहीम

4. मत्स्य 6000 असेच नाव का ?

  • समुद्रयान या मोहिमेला (Samudrayan Mission) पूर्ण करणाऱ्या पाणबुडीला मत्स्य 6000 असेच नाव का ? (Why the name Matsya 6000?) हेच नाव का हा देखील प्रश्न तुम्हाला पडला असेल.
  • या पाणबुडीला नाव देण्यासाठी माशाचे नाव संस्कृत शब्दावरून मत्स्य 6000 हे नाव देण्यात आलं आहे.
  • मत्स्य 6000 नाव यामुळे कारण ही पाणबुडी समुद्रात ६००० किलोमीटर खोलवर जाणार आहे.
  • ६००० किलोमीटर खोलवर या पाणबुडीवर पाण्याचा दबाव ६०० पट जास्त असतो.
  • तो सहन करण्यासाठी टायटेनियम (Titanium) च्या मिश्रधातूचा वापर करून ही पाणबुडी उभारण्यात आली आहे.
  • 2.1 मीटर व्यास असलेल्या या पाणबुडीत एक ऑपरेटर आणि २ ते ३ माणसं एकाच वेळी बसू शकतात.
  • ही पाणबुडी स्वयंचलित असून ती पाण्याखाली 12 तास राहू शकते.
  • आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी, या पाणबुडीत 96 तासापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होत राहील, अशी व्यवस्था केली आहे.
  • भारतीय अंतराळ संस्था( Indian Space Agency) इस्रोच्या थिरुवनंतपूरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या सहाय्यानं ही पाणबुडी विकसित करण्यात आली आहे. विविध टप्प्यांमध्ये या पाणबुडीच्या चाचण्या सुरू आहेत.
Matsya 6000
Matsya 6000

5. Samudrayaan Mission: समुद्रयान मोहीम महत्त्वाची का ?

  • मत्स्य ६००० पाणबुडीवर संपर्कयंत्रणेसोबत वेगवेगळी शास्त्रीय उपकरणं लावलेली आहेत जी आपली निरीक्षणे नोंदवतील.
  • तसंच पाणबुडीतल्या पथकाला महासागराच्या तळाचा थेट अभ्यास करता येईल.
  • समुद्रातील निकेल, कोबाल्ट (Cobalt) मँगनीज (manganese) हायड्रोथर्मल सल्फाईड (hydrothermal sulfide) आणि दुर्लभ खनिजांचा शोध घेण्यासाठी ही उपकरणं मदत करतील.
  • तसेच या भागातले सागरी प्रवाह आणि जैवविविधतेच्या अभ्यासाच्या दृष्टीनेही ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.
  • समुद्रयान मोहिमेद्वारे भारत आपली सागरी तंत्रज्ञानातली क्षमता सिद्ध करू दाखवेल.
  • तसेच समुद्राविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण करण्यासाठीही या मोहिमेची मदत होईल, अशी माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं व्यक्त केली आहे.
  • तशी १९८० पासून भारताच्या सागरी मोहिमांची सुरुवात झाली आहे.
  • हिंदी महासागरात व अरबी समुद्रात समुद्रासाठ्यांचा शोध घेण्यासाठी भारतानं तेव्हा मोहिमा आखल्या होत्या.
  • समुद्राच्या खोलात स्कूबा डायव्हिंग (Scuba diving) करताना ऑक्सिजन (Oxygen) सिलिंडर घेऊन जेव्हा आपण पाण्याखाली जातो, तेव्हा तिथे साधारणपणे ४५ मिनिटं ते १ तासच पाण्याखाली राहू शकतो.
  • दिवसातून दोन वेळेसच अशी डाईव्ह मारता येते, कारण माणूस पाण्याखाली जातो, तेव्हा त्याच्या शरिरात नायट्रोजनचं (Nitrogen) प्रमाण वाढतं आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.”
  • अशी स्कूबा डायव्हिंग करताना अभ्यासासाठी कमी वेळ मिळतो आणि जास्त खोलवरही जाता येत नाही.
  • पाणबुडीच्या सहाय्यानं प्रत्यक्षात पाण्याखाली जाऊन अभ्यास करणं योग्य ठरते.
Mission Samudrayaan
Mission Samudrayaan

6. समुद्राचाच अभ्यास कशासाठी?

  • समुद्रयान मिशन द्वारे (Samudrayaan Mission) खूप साऱ्या गोष्टी आपण समुद्राच्या उजागर करू शकतो कारण पृथ्वीचा ७० टक्क्यांहून अधिक भाग हा महासागरांनी व्यापला आहे.
  • महासागरातल्या खोलामध्ये असलेल्या जवळजवळ ८० टक्के भागापर्यंत आजही मनुष्याला पोहोचता आलं नाहीये.
  • विज्ञानाला जितकी अंतराळाविषयी उत्सुकता आहे, तेवढंच उत्सुकता समुद्राविषयीही आहे.
  • पण वैज्ञानिक कुतुहलाच्यापलीकडे यात काही सामरिक कारणंही आहेत.
  • संयुक्त राष्ट्रांच्या Convention on the Law of Sea च्या नियमानुसार कोणत्याही देशाच्या किनाऱ्यापासून 200 नॉटिकल मैल (230 मैल किंवा 370 किलोमीटर) अंतरावरचा भाग हा त्या देशाचं विशेष आर्थिक क्षेत्र (Exclusive Economic Zone) EEZ म्हणून ओळखला जातो.
  • या EEZ मध्ये येणाऱ्या महासागरावर व तिथल्या साधनसंपत्ती, जीवनावर त्या देशाचा अधिकार आसतो.
  • भारताला सुमारे ७५०० किलोमीटरहून अधिक लांब समुद्रकिनारा लाभला आहे व भारताचं विशेष आर्थिक क्षेत्र हे 23 लाख 5,143 चौरस किलोमीटर एवढा आहे.
  • समुद्राच्या या बहुतांश भागाचा आजवर फारसा अभ्यास झालेला नाही.
  • अगदी बाँबे हाय सारख्या तेलविहीरी असोत वा सागरी अभ्यास मोहिमा असोत, बहुतांश प्रकल्प हे Continental shelf सागरमग्न खंडभूमीवरच आहेत.
  • काँटिनेंटल शेल्फ (Continental shelf) म्हणजे समुद्राच्या पाण्याखाली असलेला किनाऱ्यालगतचा तुलनेनं उथळ भाग.
  • या समुद्रयान मोहिम यांच्यापलीकडे जाऊन अभ्यास करणार आहे.
  • खनिजसंपत्तीसाठीच नाही तर जैवविविधतेच्या दृष्टीनं आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठीही समुद्र अभ्यास करणे महत्त्वाचा आहे. 
समुद्रयान मिशन
समुद्रयान मिशन

7. निष्कर्ष:

  • भारताची समुद्रयान मोहीम देशाच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
  • MATSYA 6000 सबमर्सिबल विकसित करून, भारताचे लक्ष्य महासागराची खोली शोधणे, खोल-समुद्र संसाधनांचा अभ्यास करणे आणि जैवविविधतेचे मूल्यांकन करणे हे आहे.
  • या प्रकल्पाचे केवळ प्रचंड वैज्ञानिक मूल्यच नाही तर भारताच्या आर्थिक वाढीसाठी आणि शाश्वत विकासासाठी योगदान देण्याची क्षमताही आहे.

Leave a comment